नोम चोम्स्की - लेख सूची

विनाशाची क्षमता

आजच्या जीवशास्त्र्यांपैकी एक मोठा माणूस अटै मायर, याने काही वर्षांपूर्वी एक मत व्यक्त केले. तो पृथ्वी सोडून इतरत्र कुठे बुद्धिमान जीव सापडू शकतील का, यावर बोलत होता. त्याला असे जीव सापडण्याची शक्यता अगदी कमी आहे असे वाटत होते. उच्च बुद्धिमत्ता म्हणजे माणूसप्राण्यांत दिसते तश्या रचनेची बुद्धिमत्ता जीवांना कितपत परिस्थितीशी अनुरूप करते, यावर मायरचा युक्तिवाद बेतलेला …

उपभोगासाठी भीतीचे संचलन

… एका सांसदीय वादविवादात चर्चिलने आपली वास्तवावरील पकड दाखवून दिली. संरक्षणखर्च का वाढवावा, हे सांगताना तो म्हणाला, “…आपण क्षीण वारसा आणि निरागस इतिहास असलेले तरुण समाज नाही आहोत. आपण जगाची संपत्ती आणि व्यापार यांचा सर्वथा प्रमाणाबाहेर भाग स्वतःसाठी हडपला आहे. आपण हवे तेवढे भूक्षेत्र घेतले आहे. ही आपली मालमत्ता हिंसेने कमावलेली आणि प्रामुख्याने बळजोरीने राखलेली …

तीच दहशत: लक्ष्य वेगळे

(नोम चोम्स्की |Noam Chomski] हे मॅसॅच्युसेट्स तंत्रविज्ञान संस्थेत भाषाविज्ञानाचे प्राध्यापक आहेत. अमेरिकन परराष्ट्रधोरणाचे परखड टीकाकार म्हणून त्यांची कीर्ती आहे. ११ सप्टेंबर २००१ च्या घटना आणि त्यांचे संभाव्य पडसाद याबद्दल बेलग्रेडच्या एका रेडिओवाहिनीने चोम्स्कींची मुलाखत घेतली. तिच्यातील काही उतारे टाईम्स ऑफ इंडियाने २४ सप्टेंबर २००१ ला प्रकाशित केले. त्यांचा हा सारांश —-) तुम्हाला हल्ले का झाले …